प्राचार्य अशोक दौंड यांना शब्दगंध शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार

प्राचार्य अशोक दौंड यांना शब्दगंध शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित १६ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर या ठिकाणी पार पडले. याप्रसंगी राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार श्री तिलोक जैन माध्य. व उच्च माध्य.विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक दौंड यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

साहित्य नगरी अहिल्यानगर या ठिकाणी ८ आणि ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. काव्य संमेलन , शाहिरी जलसा, एकपात्री प्रयोग , परिसंवाद, कथाकथन , गझल संमेलन अशा अनेक भरगच्च कार्यक्रमाचा साहित्य संमेलनात समावेश होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे साहित्य संमेलनात अनेक विषयावर विचार मंथन झाले.

संमेलनाच्या समारोप सत्रात मा. आमदार काशिनाथ दाते, स्वागताध्यक्ष संपत दादा बारस्कर, संमेलनाध्यक्ष संजीवनी तडेगावकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटवणारे श्री तिलोक जैन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांचा शब्दगंध शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, शर्मिला गोसावी , राज्य संघटक डॉ. अशोक कानडे, उपाध्यक्ष डॉ. जी. पी.ढाकणे, कार्यवाह भारत गाडेकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, डॉ. अनिल पानखडे, हाजी हुमायून आतार, कवी राजेंद्र उदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या यशाबद्दल श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालालजी गांधी, सचिव सतीशजी गुगळे, खजिनदार सुरेशलालजी कुचेरिया, विश्वस्त धर्मचंदजी गुगळे, डॉ. ललितजी गुगळे, राजेंद्रजी मुथ्था कार्यकारी मंडळ, सल्लागार मंडळ, सर्वांनी अभिनंदन केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें