पाथर्डीत चौंडेश्वरी मातेचा नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

पाथर्डीत चौंडेश्वरी मातेचा नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

चौंडेश्वरी मातेच्या जयघोषात दुमदुमली पाथर्डी नगरी

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
शहरातील चौंडेश्वरी मातेचा नवमी उत्सव हजारो देवी भक्तांच्या साक्षीने नुकताच साजरा करण्यात आला.आखार भागातील चौंडेश्वरी मातेच्या मंदिरापासून पालखीची मिरवणूकीला आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते पूजन करून सुरवात करण्यात आली.

यावेळी चौंडेश्वरी माता की जय… या जयघोषाने पाथर्डी नगरी दुमदुमली होती.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ.मृत्युंजय गर्जे,नंदकुमार शेळके,बंडूशेठ बोरुडे,रामनाथ बंग,संजय भागवत,मुकुंद गर्जे,ॲड.प्रतीक खेडकर,प्रसाद आव्हाड,प्रशांत शेळके,राजेंद्र धुमाळ,डॉ.सचिन गांधी,चौडेश्वरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामदास कांबळे,कृष्णा रेपाळ,किशोर पारखे आदी उपस्थित होते.

   पालखीतील विराजमान मातेच्या प्रतिमेची ठिकठिकाणी पूजा करून नागरिकांनी दर्शन घेतले.पालखी मिरवणुकीत टाळ पथक,महिलांचे जोगवा पथक,झांज पथक,मुलींचे लेझीम पथक,सांस्कृतिक नृत्य,नाटिका,बँड पथक,मुलांचे भक्तीपर नृत्ये या पथकांच्या कलाविष्कारांनी पाथर्डीकर मंत्रमुग्ध झाले.
पालखी मिरवणुकीत फटाक्यांची आकाशबाजी करण्यात आली. यानिमित्त दुर्गा सप्तशती पाठ,समूह पारायण वाचन,रक्तदान शिबिर,भजन,कावडी,पालखी सोहळा व विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी गोवर्धन देखणे, हरिभाऊ वावळ, गजानन भंडारी, अमोल सोळसे, हरिष भागवत, प्रकाश इधाटे, नारायण भागवत, सुनील पारखे, चंद्रकांत सरोदे, सारिका विधाते, स्नेहल पारखे, स्वाती खोले, अरुणा हाडदे, वर्षा गुरसाळी, शारदा भैरट, अर्चना देखणे,अर्चना भंडारी, रत्नमाला बुऱ्हाडे, दिपाली चिनके, पूजा लिपारी, मंजुषा भंडारी, भारती असलकर, सुनिता उदबत्ते आदींनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें