आम्हाला आमच्या शेत जमिनीत गाळपेरा करू द्या !

आम्हाला आमच्या शेत जमिनीत गाळपेरा करू द्या !

जायकवाडी प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची मागणी….!

मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी : इसाक शेख

शेवगाव तालुक्यातील कऱ्हेटाकळी येथील काही शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पासाठी आपल्या स्व:मालकीच्या शेतजमिनी दिल्या असून त्या शेतजमिनी मूळ मालकास कसण्याचा अधिकार आहे.परंतु असे असताना देखील पैठण येथील खुले कारागृहाचे शेतकी विभागाचे अधिकारी जेलर नागनाथ भानुसे हे शेतकऱ्यांना धमकावून जमिनी ताब्यात घेत आहेत व मुळ मालकांना त्रास देत आहेत.त्यामुळे आमच्या स्व:मालकीच्या असणाऱ्या शेतजमीनी आम्हाला कसण्यासाठी परत मिळाव्यात अशी मागणी मुळ मालक असलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. कऱ्हेटाकळी येथील शेतकरी रामनाथ जाधव व इतर शेतकऱ्यांनी शेवगांवचे तहसीलदार यांना गुरुवार दि. ६ रोजी सदर मागणीचे लेखी निवेदन दिले असून तसेच मागणी मान्य न झाल्यास बुधवार दि. १२ फेबुवारी २०२५ रोजी सर्व शेतकरी शेवगाव तहसील कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करतील असा इशारा दिला आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी प्रकल्पामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या असून त्या जमिनी मूळ मालकास कसण्याचा अधिकार असताना देखील जिल्हा खुले कारागृह पैठण वर्ग १ येथील कारागृहाच्या अधिकाऱ्याला कोणतेही अधिकार नसताना जेल प्रशासनाचे शेतकी विभागाचे जेलर नागनाथ भानुशे यांनी आम्हाला धमकावून आमच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या आहेत.तसेच आमच्या काही महिला व शेतकरी शेतात गेले असता खुले कारागृहातील बंदी व काही कर्मचारी महिलांना व शेतकऱ्यांच्या हाताला धरून व धकाबुक्की करत शेताच्या बाहेर काढत आहेत.

तसेच सदर जमिनीमध्ये शेतकऱ्याचा ऊस, बाजरी, कांदा, तूर या सह अन्य शेती पिके असून नागनाथ भानुसे याने कैद्याना हाताशी धरून पिकाचे नुकसान केले आहे.तसेच शेतामध्ये पाणी घेण्यास देखील मज्जाव करत आहे. तसेच संबधित अधिकारी हा सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलीस कारवाई करण्याची धमकी सबंधित शेतकऱ्यांना देत आहे. त्यामुळे या कारागृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच जेव्हापासून ते पीक खात आहेत तेव्हापासून शेतकऱ्यांना भरपाई देऊन आमच्या शेतजमिनी पुन्हा आम्हाला कसण्यासाठी आमच्या ताब्यात मिळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.      सदर निवेदनावर रामनाथ जाधव, बाबासाहेब जाधव, जालिंदर  जाधव, पांडुरंग उल्लुळे, भाऊसाहेब उल्लुळे, अशोक उल्लुळे, सत्यभामा जाधव, संजीवनी जाधव, भिमाबाई उल्लुळे, सुनीता उल्लुळे, रुक्मिणी उल्लुळे, स्वाती उल्लुळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

आंदोलनाचा इशारा

पैठण येथील खुले कारागृहकडून शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही, सदर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागले असून संबंधित शेतकरी गाळपेरा करून कसाबसा आपला प्रपंच चालवत आहे त्यातच या गरीब शेतकऱ्यावर खुल्या कारागृहातील अधिकारी आणि कैदी दादागिरी करत असल्याने शासनाने या कैद्याला सुधारण्यासाठी आणले की दादागिरी करण्यासाठी आणले याचा देखील खुलासा होणे गरजेचे असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. 

–  नवनाथराव इसरवाडे (जिल्हाध्यक्ष जय शिवसंग्राम संघटना, अहिल्यानगर)

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें