मानिनी वायाळ ची महाराष्ट्र राज्य क्रिकेट निवड चाचणीसाठी निवड
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
शहरातील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयाची विद्यार्थीनी कु.मानिनी वायाळ हिची अंडर १७ मध्ये महाराष्ट्र राज्य क्रिकेट निवड चाचणी साठी निवड करण्यात आली आहे.
मानिनीच्या या निवडीमुळे संपूर्ण अहिल्या नगर जिल्हयातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मानिनी ही पाथर्डी येथील एस. व्ही. नेट क्रिकेट अकॅडमी येथे प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांच्याकडे गेली वर्षापासुन सराव करते. तिचे आई- वडील दोघेही शिक्षक आहेत.
तिच्या निवडी बद्दल एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रतापराव ढाकणे व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रभावती ढाकणे तसेच विद्यालयाचे मुख्याधापक श्री संजय घिगे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.