ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकष्ट आवश्यक-सुनिल गोसावी 

ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकष्ट आवश्यक-सुनिल गोसावी 

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात तालुकास्तरीय कवी संमेलन उत्साहात

पाथर्डी प्रतिनिधी:

आपल्या आवडीनिवडी जपत, छंद जोपासत ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी, तरच धेय्य पूर्ती होऊ शकते, असे मत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी यांनी व्यक्त केले.

पाथर्डी येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बाबुजी आव्हाड महाविद्यालय, मराठी विभाग व शब्दगंध पाथर्डी तालुका शाखेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी विचारपिठावर प्राचार्य डॉ बबन चौरे, माजी प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे, ज्येष्ठ कवी डॉ. कैलास दौंड, शब्दगंधचे कार्यवाह भारत गाडेकर, मुख्याध्यापक शरद मेढे, डॉ. अशोक कानडे, डॉ.राजकुमार घुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. गोसावी म्हणाले की,माणसाच्या विकासासाठी सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आवश्यकता असून त्यामुळे मानवी जीवन समृद्ध होण्यास मदत होते, जीवनामध्ये आनंद मिळवण्यासाठी आपले छंद जोपासले पाहिजेत,शब्दगंधने आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सभासदत्व देण्याचे ठरवले असून आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता.

येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी माजी प्राचार्य जी.पी. ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना केले.शाहीर भारत गाडेकर यांच्या “माणसा इथे मी तुझे गीत गावे” या वामनदादा कर्डक यांच्या मानवतावादी गीताने सुरुवात झाली. बाबुजींच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य चौरे म्हणाले की, कवितेचा जन्म दुःख वेदनेतून झाला आहे. लोक राजाला विसरतात पण कविता विसरत नाहीत. कवी अमर असतो शतकानुशतके कवी जन माणसांच्या मनात अधिराज्य गाजत असतो.

यावेळी पाथर्डी तालुक्यातील ज्येष्ठ कवी संदीप काळे, हुमायून आतार, शाहीर भारत गाडेकर, संदीप चव्हाण, बाळासाहेब चिंतामणी, प्रदीप बोडके, चंद्रकांत उदागे, ज्योती आधाट, वैशाली कदम, शरद मेढे, संतराम साबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. यावेळी आनंद महाविद्यालयाकडून दिपाली फडके, वैष्णवी साबळे, तेजस बडे, हर्षल दराडे, वैष्णवी वीर तर श्री तिलक जैन विद्यालयाकडून बालकवी शुभ्रांश काळोखे, प्रसाद गोल्हार, सन्मित्र कटारिया आणि बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे आरती राठोड, मयूर बडदे, ऋतुजा चंदेल, राधा भवार, प्रतीक्षा गर्जे यांच्यासह कवी संमेलनात तालुक्यातील ३५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनात सामाजिक, सामाजिक, प्रेमाविषयी, देशभक्तीपर, स्त्रि वेदनाच्या, ग्रामीण, विद्रोही कवितांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक कानडे व डॉ. अशोक डोळस यांनी केले. शेवटी डॉ. वैशाली आहेर आभार यांनी मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. भगवान सांगळे, प्रा. विनोद चेमटे, प्रा. शरद बोडखे, प्रा. संदीप कराड, प्रा. केंद्रे, सुनिता पालवे तसेच बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचा मराठी विभाग व पाथर्डी तालुका शब्दगंध परिषदेच्या वतीने विशेष परिश्रम घेतले. सहभागी सर्व कवींना महाविद्यालयाचा वार्षिक अंक व ग्रंथ भेट देण्यात आले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें