जवखेडे येथील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जवखेडे येथील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील श्री कानिफनाथ माध्यमिक व कै.रघुनाथ पा. वाघ उच्च माध्यमिक विद्यालयातील  इयत्ता बारावी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. 

      यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.अजय भंडारी,पत्रकार बाळासाहेब कोठूळे व प्रा.कटारिया आदी उपस्थित होते.
     यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्या शाळेतील आठवणी जाग्या करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
       यावेळी प्राचार्य संपत वांढेकर यांच्यासह प्रा.मच्छिंद्र आधाट,जेष्ठ कलाशिक्षक संजय ससाणे,प्रमुख पाहुणे प्रा.अजय भंडारी व पत्रकार बाळासाहेब कोठूळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
     जीवनात खूप यशस्वी व्हा परंतू आपल्याशाळेशी ऋणानुबंध सदैव ठेवा तसेच आपल्या आईवडिलांचा व गावाचा नावलौकिक वाढवा, असे आवाहन उद्धवराव वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती  मिरपगार  यांनी केले तर आभार प्रा.सादिक शेख यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षक बी.एच.गिरी, वरिष्ठ लिपिक राजेंद्र गोरे, प्रा.राजेंद्र मतकर, प्रा.आसिफ शेख, प्रा.सुनील नांगरे,प्रा.रवींद्र आठरे आदींसह सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें