एस टी कामगार सेनेची पाथर्डी तालुका कार्यकारणी जाहीर

एस टी कामगार सेनेची पाथर्डी तालुका कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी कल्याण गर्जे तर सचिवपदी अलीम पठाण यांची निवड

पाथर्डी प्रतिनिधी, राजेंद्र चव्हाण

एस टी कामगार सेनेच्या पाथर्डी आगारच्या तालुकाध्यक्ष पदी कल्याण गर्जे, सचिव पदी अलीम पठाण,कार्याध्यक्षपदी संतोष आंधळे तर कोषाध्यक्षपदी नारायण कंठाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
पाथर्डी आगाराची कार्यकारणी २६ जानेवारी रोजी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी अहिल्यानगर विभागीय सचिव नितीन येने,विभागीय अध्यक्ष गणेश फाटक,जिल्हा कार्याध्यक्ष राजेश घोरपडे, शिवनाथ आंधळे,नूर मोहम्मद पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली.तसेच पाथर्डी एसटी कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी शिवसेनेचा निष्ठावंत वाघ खंंबीर युवा नेतृत्व संतोष आंधळे,ज्येष्ठ नेते नारायण मामा कंठाळे यांची खजिनदार, भरत पालवे व आजिनाथ पालवे यांची उपाध्यक्षपदी,राजू उबाळे,किरण दहिफळे यांची सहसचिव पदी एकमताने निवड करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्हा प्रमुख रामदास गोल्हार,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत पवार, माजी पंचायत समिती सदस्य, तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार डाळिंबकर, युवा सेनेचे शहर प्रमुख शिवव्याख्याते सचिन नागापुरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण, नवनाथ वाघ, नवनाथ उगलमूगले, आसाराम ससे, बबन शेळके, मंगेश राठोड यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें