राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जनजागृती व्हावी: प्रा. संदीप पालवे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जनजागृती व्हावी: प्रा. संदीप पालवे

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात कार्यशाळा व कॅम्पस टूरचे आयोजन

पाथर्डी : सुयोग कोळेकर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती निर्माण करण्याचा उपक्रम महाविद्यालयाने हाती घेतला असून, इयत्ता नववी, दहावी व बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याचे वैशिष्ट्य आणि फायदे समजावून सांगणे तसेच महाविद्यालयीन वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी प्रदान करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य प्रा.संदीप पालवे यांनी केले.पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबन चौरे,समन्वयक डॉ.अशोक कानडे,पर्यवेक्षक प्रा.सलीम शेख,डॉ.अरुण राख, डॉ.अर्जुन केरकळ,डॉ.प्रशांत साळवे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
पालवे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण हे अनेक वर्षानंतर लागू होत असून यापुढील काळात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.आता कला शाखेचा विद्यार्थी विज्ञान शाखेचा विषय घेऊ शकतो.आपले करिअर घडवत असताना क्रेडिटच्या माध्यमातून विद्यार्थी नवनवीन काहीतरी शिकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकतो.नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी सक्षम होणार आहे.फक्त त्याने या धोरणाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून उपयोग करून घ्यावा असे प्रतिपादन त्यांनी केले.आनंद महाविद्यालयाचे डॉ भावसार यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विषय निवड आणि एकूणच नवीन शैक्षणिक धोरणात असणाऱ्या सर्वच गोष्टींचा आढावा घेतला.
डॉ.जयश्री खेडकर यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना या धोरणाविषयी माहिती देताना सांगितले की येणारा पुढील काळ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असून या धोरणामध्ये झालेले बदल उपयुक्त आहेत.आपण जर योग्य पद्धतीने अभ्यास करून प्रयत्न केले तर यश नक्की मिळेल.या धोरणामध्ये प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या अभ्यासाबरोबरच सर्व विद्या शाखेचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी व्हावी यासाठी महाविद्यालयात कॅम्पस टूरचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शहरातील श्री ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आठवी आणि नववीचे विद्यार्थी तसेच श्री विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे नववीचे विद्यार्थी या उपक्रमाच्या अंतर्गत सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये त्यांना ग्रंथालय, कॉम्प्युटर हॉल, ऑफिस, लेक्चर हॉल ग्राउंड, जिमखान्यातील सर्व सोयी सुविधा याविषयी माहिती देण्यात आली आणि पुढील काळात या सर्व गोष्टीचा आपण उपयोग करावा असे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य चौरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.अशोक कानडे,सुत्रसंचालन डॉ.प्रशांत साळवे, प्रा.मन्सूर शेख यांनी केले तर आभार डॉ.अरुण राख, प्रा.शेखर ससाणे, डॉ.भगवान सांगळे यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें