लाडक्या बहिणींमुळेच आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली – आ.राजळे
पाथर्डी :
राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडक्या बहिणी योजनेचा अनेक महिलांना फायदा होत असून त्याचीच उतराई म्हणून महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला दिलेल्या भरघोस मतांमुळेच आज आम्हाला आमदार म्हणून काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली असल्याची कबुली पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली आहे. तालुक्यातील चिचोंडी येथे माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर व सरपंच श्रीकांत आटकर मित्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांच्यावतीने सलग आठव्या वर्षी महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आटकर यांच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ग्रामस्थांनी मला राजकीय क्षेत्रात मोठ्या उंचीवर नेले त्यात महिलांचा मोठा वाटा असून दरवर्षी आपण अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे एकनाथ आटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांच्या पत्नी अलकाताई कर्डिले यांनी उपस्थित राहून उखाणा घेत कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी एकनाथ आटकर मित्रमंडळाच्या वतीने परिसरातील पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार विलास मुखेकर,तुळशीदास मुखेकर,सचिन नन्नवरे,सुनील नजन,रमेश पाथरकर,भिवसेन टेमकर,संतोष नन्नवरे,वजीर शेख व अंबादास गोरे आदी पत्रकारांसह सरपंच श्रीकांत आटकर,उषाताई लबडे,वैभव खलाटे,अनिताताई आटकर व गणेश महाराज कुदळे यांच्यासह माजी सरपंच अनिता एकनाथ आटकर, ग्रामपंचायत सदस्या द्वारकाबाई आव्हाड,अनिता फुलमाळी,अंबिका दानवे, आशाबाई जऱ्हाड,सपना तुपे, वंदना भिंगारदिवे,वैशाली गरुड,मिरा पोटे,मंगल डमाळे,उषा गिते,शकुंतला गीते,रंजना गीते,स्वाती घोरपडे,उषा शिंदे,रोहिणी घोरपडे, सीमा देशमुख यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.