श्री आनंद कॉलेज येथे रक्तदान शिबिर उत्साहात
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी व केमिस्ट हृदयसम्राट आ.आप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी तालुका केमिस्ट संघटना, श्री आनंद कॉलेज पाथर्डी, श्री आनंद कॉलेज फार्मसी, राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमा प्रसंगी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री. सुरेशलाल कुचेरिया अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थित सर्व रक्तदाते यांना शुभेच्छा देत रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे, असे सांगितले. प्रस्ताविक करताना संघटनेचे श्री. विश्वजीत गुगळे यांनी आपल्या भाषणात रक्तदानाचे महत्त्व समजून सांगितले. आभार सचिन पाटसकर यांनी मानले.
अहिल्यानगर महानगर पालिका रक्त संकलन केंद्र चे रक्त संकलन अधिकारी डॉ. सोमनाथ नंदकर, जनसंपर्क अधिकारी संतोष काळे व इतर कर्मचारी, पाथर्डी तालुका केमिस्ट संघटनेचे सचिव प्रकाश पालवे, केमिस्ट संघटनेचे श्री. चंदन कुचेरिया, श्री. अरुण आंधळे, श्री. निलेश मंत्री, श्री. पंकज मुनोत, जालिंदर सदावर्ते, श्री.अमोल फुंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. इस्माईल शेख, डॉ. धीरज भावसार, डॉ. अजिंक्य भोर्डे, डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विलास भगत, श्री. महेंद्र शिरसाठू, प्रा. सूर्यकांत काळोखे, डॉ. प्रतिक नागवडे, डॉ. बथूवेल पगारे, प्रा. अभिषेक जोशी, डॉ. संदीप कांबळे, डॉ. रविंद्र भोईटे, सर्व रक्तदाते सह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.