विद्यार्थी जडणघडणीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची-बालकलाकार जयेश खरे

विद्यार्थी जडणघडणीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची-बालकलाकार जयेश खरे

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:

शहरातील पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्या मंदिर या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मराठी चित्रपटातील गायक प्रसिद्ध बालकलाकार जयेश खरे याच्या उपस्थितीत संपन्न झाला.

वार्षिक पारितोषिक समारंभ प्रसंगी बालकलाकार जयेश खरे याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आई-वडिलांबरोबरच शिक्षकाची भूमिका फार महत्त्वपूर्ण असते. आज महाराष्ट्रात जे मला स्थान प्राप्त झाले आहे, ते फक्त माझ्या आई-वडिलांमुळे तसेच शाळेतील शिक्षकांमुळे. माझ्या घरामध्ये व शाळेमधून मला नेहमी गायनासाठी प्रोत्साहन मिळाले तसेच महाराष्ट्रातील सर्व रसिकांनी मला प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड होते.याप्रसंगी त्यांनी सांगितले,की विद्यार्थ्यांनी शालेय वयात सातत्यपूर्ण अभ्यास करावा. अभ्यासातूनच विद्यार्थ्यांचे करिअर घडते. विद्यार्थ्यांनी मीडिया व मोबाईलच्या आहारी न जाता मैदानावर दररोज एक तास द्यावा व आपले शारीरिक आरोग्य चांगले राहील, असा व्यायाम करावा. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी भरपूर अभ्यास करा, शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या व परीक्षेत गुणवंत व किर्तीवंत व्हा.

याप्रसंगी बालकलाकार जयेश खरे याने हिंदी व मराठी चित्रपट गीते सादर करून उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मंत्रमुग्ध केले. काही गाण्यावर तर विद्यार्थ्यांनी नृत्याचा ठेका धरला.वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात एस.एस.सी.बोर्ड परीक्षा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, गणित विज्ञान प्रदर्शन, शालेयस्तरावर आयोजित उपक्रमातील गुणवंत विद्यार्थी, राज्यस्तर- विभागस्तर- जिल्हास्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेमधील नैपुण्य प्राप्त विद्यार्थी, विविध शालाबाह्य स्पर्धा परीक्षा तसेच विविध गुणदर्शन समारंभ या सर्व घटकांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य, प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन १०४५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशराव आव्हाड, बालकलाकार जयेश खरे, विश्वास खरे, सदस्या शाहीन मुनीर आतार, प्राचार्य बी.ए.चौरे,मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, पर्यवेक्षक संपत घारे व शिक्षक शिक्षकेतर तसेच बहुसंख्येने पालक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना दराडे व रेश्मा सातपुते यांनी केले तर प्रास्ताविक शरद मेढे यांनी करून अनुजा कुलकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सांस्कृतिक समिती सदस्य व क्रीडा विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें