|
मिरी गटात आ.मोनिका राजळे यांचे वर्चस्व कमी तर आ.कर्डीलेंची पकड घट्ट?

संपादकीय – वास्तव (भाग-१)
त्यामुळे पाथर्डी तालुक्याच्या पंचायत समिती,बाजार समिती,साखर कारखाना व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने या भागाचा आ.मोनिका राजळे यांच्याशी सबंध येतो.तर विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने आ.कर्डिले यांचे देखील या भागावर विशेष लक्ष असते.
दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मिरी व परिसरातील अनेक युवा कार्यकर्त्यांना राजकारणाचे धडे देऊन आपलेसे केले होते.त्यामुळं राजीव राजळे यांच्याशी या भागातील अनेकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्याचाच परिपाक म्हणून स्व.राजीव राजळे हे स्वतः सुरवातीला काँग्रेस नंतर अपक्ष व शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणुकीत उतरलेले असताना देखील मिरी व करंजी परिसरातील कार्यकर्त्यांनी पक्ष न पाहता स्व.राजीव राजळे यांना विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत मोठी राजकीय ताकद दिल्याचा इतिहास आहे. परंतु स्व.राजीव राजळे यांना निवडणुकीत यश न आल्याने त्यांनी सरतेशेवटी पत्नी मोनिका राजळे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांच्या हक्काच्या व विश्वासाच्या मिरी-करंजी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी देखील राजळे यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मोनिकाताई राजळे यांना निवडून आणले.पुढे मोनिकाताई राजळे यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष होण्याची देखील संधी मिळाली होती.
आ.राजळे यांनी मिरी गटाचे प्रतिनिधित्व केलेले असल्याने त्यांनी आ.कर्डिले यांच्या साथीने तत्कालीन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांची सभा घेऊन चारुदत्त वाघ यांना निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.परंतु तरी देखील त्याचा निकालावर काहीही परिणाम दिसून आला नाही व चारुदत्त वाघ यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेचे अनिलराव कराळे व काँग्रेसचे मोहनराव पालवे यांच्यातच अटीतटीचा सामना होऊन अनिल कराळे विजय झाले तर राजळे समर्थक चारुदत्त वाघ यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.त्यामुळे आमदार राजळे यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीतील हा दुसरा मोठा धक्का मानला गेला होता.याउलट आ.कर्डिले यांनी करंजी गणातील उमेदवार निवडून आणला तर मिरी गणातील उमेदवाराला पराभव स्विकारावा लागला.
क्रमशः…… (भाग २ लवकरच)
विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)