पाथर्डी शहरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाला सुरुवात

पाथर्डी शहरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाला सुरुवात

नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नगरसेवक अमोल गर्जे यांचा पुढाकार

सचिन नन्नवरे

पाथर्डी — पाथर्डी शहरातील प्रभाग पाचमध्ये पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्याच्या मधोमध व बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना चालताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन नवनिर्वाचित नगरसेवक अमोल भैया गर्जे यांच्या माध्यमातून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

या कामाच्या प्रारंभप्रसंगी बंडू शेठ दानापुरे, संपतलाल गांधी, सुनील भाऊ, चिंतामणी सतीश भाऊ पांनगे, बाळासाहेब शहाणे, वैभव खेडकर, बोराशेठ बाळासाहेब येळाई आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, याच प्रभागा मधील मुख्य रस्त्यावरील भूमिगत गटार कामाचे देखील भूमिपूजन नगरसेवक अमोल भैया गर्जे व पेठेतील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या मार्गावर देखील दर्जेदार सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर लगेचच नगरसेवक अमोल गर्जे यांनी कामाचा धडाका सुरू केल्याने त्यांच्या कामाबद्दल पाथर्डी शहरवासीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें