आ.प्रसाद लाड यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा ही अभिमानाची बाब

आ.प्रसाद लाड यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा ही अभिमानाची बाब

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष कुशल भापसे यांचे प्रतिपादन

सचिन नन्नवरे

पाथर्डी : महाराष्ट्र विधान परिषदेतील मुख्य प्रतोद तथा आमदार प्रसाद लाड यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. ही अत्यंत गौरवास्पद व अभिमानास्पद बाब असून, या निर्णयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुशल भापसे यांनी आमदार लाड यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. आमदार प्रसादजी लाड हे माझे मार्गदर्शक असून त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, अनुभवसंपन्न कार्यशैलीमुळे आणि जनहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण योगदानामुळेच त्यांना हा मान मिळाल्याचे भापसे यांनी नमूद केले.

“हा सन्मान केवळ आमदार प्रसादजी लाड यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. लोकहिताची जाण, संघटनात्मक ताकद आणि प्रभावी नेतृत्व यांच्या जोरावर त्यांनी नेहमीच राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला आहे,” असे गौरवोद्गार कुशल भापसे यांनी काढले. पुढे बोलताना भापसे म्हणाले, “मंत्री प्रसाद लाड साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितच अधिक गती मिळेल.”

कुशल भापसे हे आमदार प्रसादजी लाड यांचे जवळचे नातेवाईक असून, त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें