वडगावची कु.शुभ्रा सातपुते ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ शैक्षणिक सहलीसाठी निवड

पाथर्डी : शैक्षणिक विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आयोजित डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (थुंबा, केरळ) शैक्षणिक सहल 2025-26 साठी तालुका स्तरावरील निवड प्रक्रियेत पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. शुभ्रा अरुण सातपुते हिची निवड झाली आहे.
या यशामुळे शुभ्रावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. घरची परिस्थिती अगदी सामान्य असतानाही शुभ्राने मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
“या यशामध्ये माझ्या शिक्षकांसह आई-वडिलांचा मोठा वाटा आहे,” असे समाधान व्यक्त करत शुभ्राने सांगितले. तिचे शिक्षक, गावकरी मंडळी, वडगाव मित्र परिवार तसेच चर्मकार विकास संघ, अहिल्यानगर यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.







