मिरीत कानिफनाथांच्या छबिना मिरवणुकीत उत्साह; महाआरतीवेळी वरुणराजाची हजेरी

मिरीत कानिफनाथांच्या छबिना मिरवणुकीत उत्साह; महाआरतीवेळी पावसाने हजेरी लावली

सचिन नन्नवरे, मिरी 

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे तिसऱ्या श्रावणी शुक्रवार निमित्त ग्रामदैवत व जागृत देवस्थान असलेल्या चैतन्य कानिफनाथांच्या भव्य छबिना मिरवणुकीचे आयोजन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी डीजेच्या गजरात नाथभक्तांनी नाथांच्या भक्तिगीतांवर ठेका धरत नृत्य करत मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.

ही मिरवणूक श्री कानिफनाथ मंदिरापासून हनुमान मंदिरापर्यंत जल्लोषात काढण्यात आली. त्यानंतर हनुमान मंदिर परिसरात मिरवणूक आल्यावर नाथांची संजीवनी समाधी असलेल्या श्री क्षेत्र मढी च्या दिशेकडे उभे राहून नाथांचे स्मरण   करून महाआरती करण्यात आली. यावेळी परिसरातील नाथभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरती वेळी वरुण राजाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून मिरी परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. अनेक पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र महाआरती सुरू असतानाच अचानक आकाशात ढग दाटले आणि पावसाच्या सरी पडू लागल्याने नाथभक्त व ग्रामस्थांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. “नाथांच्या कृपेने लवकरच समाधानकारक पाऊस पडेल,” अशी आशा देखील यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

मिरी गावातील कानिफनाथ मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या मंदिरास प्राचीन इतिहास आहे. मिरीपासून काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांनी संजीवनी समाधी घेण्यापूर्वी मिरी येथे अनेक दिवस वास्तव्य केल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. त्यामुळे रंगपंचमीपासून गुढीपाडव्यापर्यंत मढी येथे होणाऱ्या यात्रेनिमित्त येणारे नाथभक्त आवर्जून मिरी येथील नाथमंदिराला भेट देऊन दर्शन घेतात. त्यामुळे या काळात मिरी परिसरात नाथभक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते.

        कानिफनाथ हे नाथसंप्रदायातील एक प्रमुख नाथ असून श्रद्धेने व भक्तिभावाने प्रार्थना करणाऱ्या भाविकांना आजही त्यांच्या कृपेची व चमत्काराची अनुभूती येते.त्यामुळेच मिरी व मढी हे दोन्ही ठिकाणे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात.

त्याच अनुषंगाने मिरी येथे कानिफनाथांच्या भव्य अशा हेमाडपंथी दगडी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू असून या कामासाठी नातभक्तांनी सढळ हाताने सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें