लाडकी बहिण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांना राख्या – भाजपा मिरी-तिसगाव मंडळाचा उपक्रम

लाडकी बहिण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांना राख्या – भाजपा मिरी-तिसगाव मंडळाचा उपक्रम

मिरी (ता. पाथर्डी) – महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे हजारो कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला असून, महिलांचे सक्षमीकरण साधले जात आहे. या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठवण्याचा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या मिरी-तिसगाव मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असल्याची माहिती मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे.          या उपक्रमाचे आयोजन राहुरी–नगर–पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तसेच भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवानेते अक्षय दादा कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले आहे. 

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, राख्या महिलांकडून गोळा करून त्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने एकत्रितरीत्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत. या राख्यांमध्ये महिलांची भावना, शुभेच्छा आणि कृतज्ञतेचा संदेश सामावलेला असणार आहे. हा उपक्रम केवळ भावनिक स्तरावर मर्यादित न राहता, महिलांमध्ये आत्मसन्मान व सरकारबद्दल विश्वास वाढवणारा ठरत आहे.

       राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या या अभिनव योजनेतून प्रत्येक महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत मिळत असल्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्या स्वतःच्या घरगुती गरजा भागवू शकतात, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकतात आणि आपला स्वाभिमान जपत जीवन जगत आहेत. यामागे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची दूरदृष्टी आहे. त्यामुळे महिलांमध्ये या योजनेबद्दल असलेले समाधान व आनंद पाहूनच हा उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले आहे. मिरी, करंजी व तिसगाव परिसरातील महिला उत्स्फूर्तपणे या उपक्रमामध्ये सहभागी होत असल्याचे बघायला मिळत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें