DYSP संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई: अवैध मावा कारखान्यावर छापा, २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर : अवैध मावा व सुगंधीत तंबाखू उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ₹२,०८,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१७ जुलै रोजी अहिल्यानगर शहरातील काटवण खंडोबा रोड येथील विश्वास डांगे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधीत तंबाखू व मावा तयार करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती श्री. खाडे यांना मिळाली. त्यांनी विशेष पथकासह तात्काळ छापेमारी केली.
या कारवाईत कैलास मोकाटे, सुभाष डागवाले, शाम मोकाटे व राहुल पारधे या चौघांना अटक करण्यात आली. छाप्यात ३६ किलो सुगंधीत तंबाखू, १९ किलो मावा, २ मोठ्या आणि १ लहान मशीन असा एकूण २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबमे, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत DYSP संतोष खाडे यांच्यासह पोसई राजेंद्र वाघ, पोहेका शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर व इतर पथकातील कर्मचारी सहभागी झाले.