मिरी येथे शुक्रवारी शासनाच्या वतीने ’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन

मिरी येथे शुक्रवारी शासनाच्या वतीने ’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन

मिरी (ता. पाथर्डी) – महसूल व वन विभाग तथा तालुका प्रशासन, पाथर्डी, जि. अहिल्यानगर यांच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखड्यांतर्गत व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान”ाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मिरी (ता. पाथर्डी) येथील राजयोग मंगल कार्यालयात पार पडणार आहे.

या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा, समस्या निवारण, नागरीकांच्या तक्रारींचे निवारण, विविध प्रमाणपत्रांचे वाटप, कागदपत्र पडताळणी आदींचा समावेश असणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर, उपविभागीय अधिकारी (पाथर्डी उपविभाग), तसेच तहसीलदार पाथर्डी यांचे विशेष योगदान आहे.

शिबिर स्थळ:
राजयोग मंगल कार्यालय, मिरी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर

दिनांक व वेळ:
शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वा.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें