शेवगांव व पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्‍यक्ष पंचनामे करून तात्काळ आपद‌्ग्रस्तांना मदत करा – आमदार मोनिकाताई राजळे

शेवगांव व पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्‍यक्ष पंचनामे करून तात्काळ आपद‌्ग्रस्तांना मदत करा – आमदार मोनिकाताई राजळे

पाथर्डी: सुयोग कोळेकर 

शेवगांव व पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे , मालमत्तेचे तसेच फळबागा व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्‍यक्ष पंचनामे करून संबंधितांना तात्काळ मदत करण्याच्या सुचना आमदार मोनिकाताई राजळे यांनी तहसीलदार तसेच संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या.जिवितहानी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तसेच नुकसानग्रस्तांना शासनाच्या माध्यमातुन योग्य ती मदत करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

बुधवार दिनांक ११ जुन रोजी शेवगांव व पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बहुतांशी ठिकाणी शेतकर्यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे,या वादळात अंगावर झाड पडल्याने दहिफळ येथील एका महिलेचा मृत्यु झाला तर तिघे जखमी झाले आहेत.विद्युत विभागाने वादळग्रस्त भागातील पडलेले विद्युत खांब, विद्युत रोहित्राची (डीपी) त्वरित दुरूस्ती करावी. नुकसानग्रस्त भागात घरावर, गोठ्यावर झाडे पडल्याने मोठे नुकसान झालेले आहे, वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान नुकसान झाले आहे. यासंदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी आमदार राजळे यांनी दिले आहेत.
शेवगांव तालुक्यातील दहिगांव ने, रांजणी, भावीनिमगांव, मठाचीवाडी, शहरटाकळी, मजलेशहर, भायगांव या गावाची नुकसानीची पाहणी आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज केली. यावेळी प्रभारी तहसीलदार दिपक कारखेले, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, विद्युत वितरणचे अभियंता दिवेकर, संबधीत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच भाजपाचे जेष्ठ नेते वाय.डी. कोल्हे, संदीप खरड, ताराचंद लोढे, कल्याण जगदाळे, अनिल सुपेकर, रामा मुंगसे, लक्ष्मण काशिद, बशीर पठाण, आसाराम नऱ्हे, शरद थोटे, आप्पासाहेब सुकासे, मोहनराव लोढे, नवनाथ फासाटे, संतोष आढाव, सुरेश बडे, अशोकराव देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें