दहा दिवशीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबीर समारोप मोठ्या उत्साहात संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
भारतीय बौद्ध महासभा पाथर्डी तालुका आयोजित १० दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचा समारोप श्री तिलोक ज्ञान प्रसारक मंडळाचे आदर्श वस्तीगृह पाथर्डी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा महासचिव सतीश ओहोळ, कोषाध्यक्ष विजय हुसळे , संस्कार उपाध्यक्ष भगवंत गायकवाड, संरक्षक सचिव संतोष गायकवाड, पाथर्डी प्रभारी अरुण भोंगळे, जिल्हा संघटक बाळासाहेब धस तसेच पूज्यनीय भंते पटिशेन व प्रशिक्षण प्रमुख केंद्रीय शिक्षक निसर्गंध गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
१० दिवसीय श्रामनेर शिबिराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा पाथर्डी तालुक्याच्या अंतर्गत राबवण्यात आले. शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पाथर्डी तालुका अध्यक्ष श्रीपद बळीद, सरचिटणीस दिलीप सरसे, कोषाध्यक्ष संजय साळवे, आयु.सुंदर मामा कांबळे, महेंद्र राजगुरू, जगदीश गाडे, एकनाथ ठोकळ, गौतम ढेकणे, फकिरा क्षेत्रे, छानराज क्षेत्रे, तुकाराम साळवे, ज्ञानेश्वर साळवे, बौद्धाचार्य लौकिक कांबळे, बुद्धम राजगुरू, मंदाकिनी गाडे, माया कांबळे, ज्योती राजगुरू यांनी मेहनत घेतली.
महिला तालुका अध्यक्षा मीनाताई शिंदे, महिला जि. संघटक भारती भोगले, दिक्षा बनसोडे, छायाताई भोगले, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पू शेठ बोर्डे, समता सैनिक दलचे सिद्धार्थ सोनवणे, शेवगाव शहर अध्यक्ष सतिश ठोंबे, सचिव सुनील साळवे, शेवगाव संघटक नितीन खंडागळे, दिपक बनसोडे तसेच पाथर्डी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. पाथर्डी तालुक्यात गेली२५ वर्षानंतर पहिल्यांदाच बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर होत आहे, म्हणून सर्व पदाधिकारी मोठ्या आनंदात ,उत्साहात सामील होऊन काम करत होते. पाथर्डी तालुक्यात चांगल्या प्रकारे धम्ममय वातावरण तयार झाले, अशी लोकांची प्रतिक्रिया मिळत आहे.
याप्रसंगी बालमटाकळी, शेवगाव, चापडगाव, करंजी कोळसांगवी, पाथर्डी, निवडुंगे चिंचपूर पांगुळ, साकेगाव सह पंचक्रोशीतील महिला व उपासक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.