निवडूंगे येथे श्रामनेर संघाचे स्वागत व भोजनदान
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील निवडूंगे येथील माता रमाई महिला मंडळाच्या वतीने पूज्य भंते- ए. सुमेध बोधिजी व श्रामनेर संघ यांचा स्वागत सोहळा निवडूंगे येथे व भोजनदान कार्यक्रम निवडुंगे येथील चव्हाण निवास येथे आयोजित करण्यात आला होता.
शाखा पाथर्डी भारतीय बौद्ध महासभा, सर्व सभासद व सर्व बौद्ध उपासक- उपासिका यांचे वतीने यावर्षी पाथर्डी येथील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यार्थी वस्तीगृह येथे बौद्धाचार्य श्रामनेर धम्म प्रशिक्षण शिबिर दिनांक १० मे २०२५ ते २० मे २०२५ दरम्यान पार पडत आहे. त्यानिमित्ताने निवडुंगे येथील धम्मउपासिका माता रमाई महिला मंडळाच्या विद्यमाने दिनांक १५ मे रोजी श्रामनेर संघाचे मढी- निवडूंगे मार्गावरुन त्यांचेवर पुष्पवृष्टी करून आयुष्यमान मनोहर चव्हाण यांचे चव्हाण निवास येथे आगमन झाले.
यावेळी पंचशील, सामूहिक वंदना पूज्य भंते सुमेध बोधिजी यांनी धम्मदेसना दिली. माता रमाई मंडळ यांनी श्रामनेर संघास व उपस्थित श्रद्धावंतास श्रद्धापूर्वक त्यांच्या सम्यक आदीविकेतून भोजनदान दिले गेले. भोजनदानाचे अनुमोदन म्हणून श्रामनेर संघाने संपूर्ण माता रमाई महिला मंडळ परिवाराच्या प्रति मंगलमय मैत्री, सदभावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बौद्ध महासभा महिला आघाडी तालुकाध्यक्ष मीनाताई शिंदे, सुशीला चव्हाण, ललिता शिंदे, प्राजक्ता शिंदे, विमल चव्हाण, मनोहर चव्हाण, बबन चव्हाण, प्रल्हाद शिंदे, सुधाकर शिंदे, मंगेश शिंदे, ज्योती शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर जिल्हा कोषाध्यक्ष विजय हुसळे, जिल्हा संघटक तथा जामखेड प्रभारी बाळासाहेब धस, माजी राष्ट्रीय संघटक व्ही. एन. निसर्गंध, तालुकाध्यक्ष श्रीपत बळीद, कोषाध्यक्ष संजय साळवे, हिशेब तपासणीस महेंद्र राजगुरू, संघटक एकनाथ ठोकळ, सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे, दिगंबर गाडे, डॉ. अशोक डोळस, पत्रकार राजेंद्र चव्हाण, गौतम ढेकणे, सौ. कांबळे, ज्योती राजगुरू, लौकिक कांबळे, बुद्धम् राजगुरू आदींची उपस्थिती होती.