शशिकांत गायकवाड यांची बुवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यवाह प्रमुखपदी निवड

शशिकांत गायकवाड यांची बुवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यवाह प्रमुखपदी निवड

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये पाथर्डी येथील रहिवाशी आणि गेली अनेक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्य करणारे श्री शशिकांत गायकवाड यांची नुकतीच बुवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यवाह प्रमुखपदी निवड झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बाबासाहेब बुधवंत होते. यावेळी राज्य सरचिटणीस श्री ठकसेन गोरणे, राज्य प्रधान सचिव अँड. रंजना गवांदे, जिल्हा प्रधान सचिव माजी प्राचार्य अशोकराव गवांदे, राज्यकार्यवाह बाबा आरगडे, प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.प्रकाश गरुड, विनायक सापा, प्रमोद भारुळे आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल पाथर्डी महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी शशिकांत गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें