करोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील करोडी येथे भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण, पंचशील घेऊन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.
या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष श्रीपाद बळीद, कोषाध्यक्ष संजय साळवे, दिनकर खंडागळे, भिमराज शिंदे, मीनाताई शिंदे, (भा बौद्ध जि. संघटक), भारती भोंगळे,अशोक चोरमले, योगेश गोल्हार,( भा. बौद्ध महासभा जि. संघटक, पाथर्डी प्रभारी )आयु.अरुण भोंगळे (भा. बौद्ध महासभा जि. संघटक), आयु. बाळासाहेब धस शेवगाव ता.कोषाध्यक्ष, बाळासाहेब लहासे यांची प्रमुख उपस्थिती होती. समता सैनिक दलाचे सैनिक सिद्धार्थ सोनवणे, सिद्धार्थ पटवेकर, शशिकांत भोंगळे, अमित भोंगळे, विजय बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी प्रमुख भाषण श्रीपाद बळीद, अशोक चोरमले, मिराताई शिंदे यांनी केले.
सूत्र सूत्रसंचालन बौद्धाचार्य अरुण भोंगळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे सदस्य बाबासाहेब खंडागळे, दिनकर खंडागळे, संतोष खंडागळे, भिमसेन खंडागळे, दादासाहेब अंगरखे, साईनाथ खंडागळे, अन्नासाहेब खंडागळे, शरद खंडागळे, हारीभाऊ खंडागळे, देवदान अंगरखे, बाळू खंडागळे, सुभाष खंडागळे, संदिप अंगरखे, महादेव खंडागळे व महिला मंडळ करोडी आदी गावातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.