प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांकडून आदर्श शिक्षकांचा सन्मान
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन श्री रमेश गोरे यांचे संकल्पनेतून सुरू केलेली आदर्श शिक्षकांसाठी सत्कार पद्धत, ती म्हणजे आदर्श शिक्षकांच्या शाळेत जाऊन त्यांचा सत्कार करणे होय. त्या अनुषंगाने प्रत्यक्षात ही पद्धत अमलात आणली.
मा. व्हाईस चेअरमन श्री रमेश गोरे, संचालक शेवगाव तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस व अहिल्यानगर शिक्षक बँकेचे पाथर्डी तालुका संचालक श्री कल्याणजीराव लवांडे यांनी सोमठाणे नलवडे या ठिकाणी प्रत्यक्ष शाळेत जाऊन सन २०२३ चे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री भागिनाथ बडे व याच शाळेवरील सन २०२४ चे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री नामदेव धायतडक तसेच या शाळेचे सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर गर्जे यांचा सन्मान केला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते एन. एम. एम. एस. परीक्षेत पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सत्काराची ही अनोखी पद्धत सुरू केल्याने अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे व इतर मान्यवरांचे सोमठाणे नलवडे या शाळेतील शिक्षकांनी स्वागत करून आभार मानले.