आम्हाला कुणी काही बोलले तर एखाद्याला जीवे मारून टाकू!
लोहसर येथील यात्रेत तमाशा बंद पाडून तरुणांचा धुडगूस
भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गिते यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल
करंजी (प्रति)- अशोक मोरे
पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील श्रीकाल भैरवनाथाची मोठी यात्रा भरते. दरवर्षी शांततेत पार पडणाऱ्या या यात्रेत मात्र काही तरुणांनी धिंगाणा घालुन यात्रेतील तमाशात गोंधळ घालुन तमाशा बंद पाडला.तसेच समजावून सांगणाऱ्या यात्रा कमिटीतील सदस्यांशी हुज्जत घालून आम्हाला कुणी काही बोलले तर एखाद्याला जीवे मारून टाकू अशी धमकी दिल्याने या तरुणांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे दि. १२ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान श्री काल भैरवनाथाची मोठी यात्रा भरते. या दरम्यान कावडी मिरवणुक, छबीना, हंगामा असे कार्यक्रम आयोजित केले होते. दि. १३ एप्रिल रोजी गावात तमाशाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास लोहसर येथील भैरवनाथ ट्रस्टचे विश्वस्त शिवाजी तुळशीराम दगडखैर, गोरख विश्वनाथ गिते, बाबासाहेब हनुमंत गिते, बाजीराव यशवंतराव गिते व पंच कमिटी या यात्रेतील तमाशाच्या कार्यक्रमास हजर होते. तमाशाचा कार्यक्रम चालु असताना लोहसर येथील अविनाश दिनकर पालवे, व रविंद्र दिनकर पालवे हे तमाशाच्या स्टेजवर जाऊन धिंगाणा व आरडा ओरड करीत असताना तेथे उपस्थित असलेले ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गिते व ट्रस्टच्या सदस्यांनी तसेच पंचकमिटीने त्यांना समजावुन खाली उतरण्याची विनंती केली. पण त्याचवेळी तेथे असलेले खंडू शहादेव वायभासे, प्रकाश बाळासाहेब पवार, कार्तिक दत्तु गिते, कृष्णा संदिप गिते, निलेश रामदास वारे सर्व राहणार लोहसर ता. पाथर्डी हे सर्व जणांनी मला व विश्वस्त तसेच पंचकमिटीला शिवीगाळ करुन तमाशाचा सार्वजनिक कार्यक्रम आरडा-ओरड करुन बंद पाडुन जर आम्हाला कोणी काही बोलले तर एखाद्याला जिवच मारुन टाकु अशी धमकी दिली.तसेच तमाशा कलावंतांना देखील शिवीगाळ करुन धमकाविल्या प्रकरणी श्री काल भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अनुराग तथा अनिल जगन्नाथ गिते यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.