आगसखांड येथे काळभैरवनाथ यात्रा उत्सव
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील आगसखांड येथील काळभैरवनाथ जागृत देवस्थान यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी कावडीचे प्रस्थान होणार असून रविवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत गावामध्ये भव्य कावडी मिरवणूक होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संवाद छबीना मिरवणूक व भव्य शोभेच्या दारूची आतिषबाजी होणार आहे तसेच सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी कलाकारांच्या हजे-या व ४ वाजता नामावंत पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान (हंगाम) आयोजित करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी ९ वाजता लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आलेला आहे, तरी सर्व ग्रामस्थ भाविक भक्तांनी यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सदस्य व यात्रा कमिटी व ग्रामस्थ आगसखांड यांनी केले आहे.