समताधिष्ठित समाज निर्मितीमध्ये महात्मा फुलेंचे मोलाचे योगदान- प्राचार्य टेमकर

समताधिष्ठित समाज निर्मितीमध्ये महात्मा फुलेंचे मोलाचे योगदान- प्राचार्य टेमकर

राजळे महाविद्यालयात क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना अभिवादन

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. टेमकर यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. महात्मा फुले भारतातील थोर समाजसुधारक व लेखक होते. फुले यांनी भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचे मोलाचे कार्य केले. आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासाठी खर्च करून स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ‘गुलामगिरी’ हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ असून तत्कालीन समाजातील अनिष्ट प्रथा, परंपराविरुद्ध महात्मा फुले यांनी आपल्या साहित्यकृतीतून आवाज उठवला. तत्कालीन समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. समाजात समता, न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे आचार-विचार, चारित्र्य आणि चरित्र संपूर्ण समाजाला प्रेरणादायी, बोध घेण्यासारखे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री. विक्रम राजळे, विद्याशाखाप्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी, डॉ. जे. एन. नेहुल, प्रा. सी. एन. पानसरे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. म्हस्के, ग्रंथपाल डॉ. आर. पी. घुले व प्रा. अरुण बढे व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गायकवाड यांनी केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें