प्रामाणिक अभ्यासामुळेच विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता प्राप्त होते-अभय आव्हाड
दहा विद्यार्थ्यांना प्राप्त होणार ४,८०,००० रुपये शिष्यवृत्ती
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डी संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर या शाळेतील दहा विद्यार्थ्यांची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
गौरव समारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सातत्य व चिकाटीने अभ्यास केला तरच यश प्राप्त होते. इतर विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता प्रामाणिकपणे अभ्यास करावा, अभ्यासानेच विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची बौद्धिक प्रगल्भता येते. विद्यार्थ्यांनी मैदानावर येऊन किमान एक तास विविध प्रकारचे खेळ खेळावेत. खेळामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होते.उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध पुस्तके वाचावीत, असे आवाहान यावेळी केले.
स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे: अनाप कार्तिकी नंदू, ढाकणे दीपक शरद, खेडकर किरण शशिकांत, बटुळे साक्षी शिवाजी, एकशिंगे सोहम संदीप, पानवळ सार्थक राजेंद्र, सातपुते श्रावण सतीश, शेंबडे श्रावणी अभिमान, बोरुडे श्रावणी शंकर, दातखिळ हरी ओम प्रल्हाद.
प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला केंद्र शासनाच्या वतीने इयत्ता नववी ते बारावी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे वतीने शैक्षणिक साहित्य, फेटे बांधून गुलाबपुष्प व पेढे देऊन सत्कार केला. यावेळी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
गौरव समारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए.चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, पर्यवेक्षक संपत घारे, प्रा. ब्रह्मानंद दराडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना विठ्ठल धस, सतीश डोळे ,अभिजीत सरोदे, निखिल देशमुख, संदीप धायतडक यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर आभार शरद मेढे यांनी मानले.