डॉ.अशोक कानडे मन्वंतर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

डॉ.अशोक कानडे मन्वंतर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक कानडे यांना देडगाव येथील मन्वंतर सामाजिक संस्थेच्या वतीने मन्वंतर आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेवासा तालुक्यातील देडगाव मधील मन्वंतर सामाजिक संस्था संचलित तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल येथे मन्वंतर राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
डॉ कानडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य असून अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. शिल्प व कला संस्थेचे उपाध्यक्ष व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक म्हणून ते काम पाहतात. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद व सेमिनार मध्ये त्यांची व्याख्याने व शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. वेगवेगळ्या विषयावर त्यांची व्याख्याने व सामाजिक कार्यात त्यांचा सतत सहभाग असतो त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल डॉ अशोक कानडे यांना मन्वंतर आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार उद्योजक श्री.सुरेशराव शेटे व डॉ. सातप्पा चव्हाण अहमदनगर कॉलेज यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. अशोक कानडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी बोलतांना प्रा. डॉ. सातप्पा चव्हाण म्हणाले की, समाजामध्ये विविध क्षेत्रात चांगले उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे, ही चांगली बाब आहे. मन्वंतर संस्था ही अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन मनोबल वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत असते, पुरस्कार घेणारे जसे हात असतात तसेच पुरस्कार देणारे हातही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यांचे हात बळकट करण्यासाठी पुरस्कार स्वीकारणाऱ्यांची व सर्व समाजाची एक बांधिलकी आहे की पुरस्कार देणाऱ्याचेही हात बळकट केले पाहिजेत. ती आपली जबाबदारी आहे, यामधून प्रेरणा घेऊन विद्यार्थी आपल्या जीवनात बदल घडवतील व या देशातील सुजाण नागरिक म्हणून वावरतील.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक सुरेशराव शेटे, डॉ. सातप्पा चव्हाण, अध्यक्षस्थानी संस्थापक डॉ. विजय कदम होते. सरपंच चंद्रकांत मुंगसे, साहेबराव कदम, कृषी अधिकारी संजय कदम, संस्थेच्या संचालिका शुभांगी कदम, प्राचार्य विठ्ठल कदम, उप प्राचार्य संजय खाटीक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. कानडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष अँड. सुरेशराव आव्हाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य प्राचार्य देविदास वायदंडे, सिनेट सदस्य डॉ. सुनील लोखंडे, प्रा. संदिप पालवे, सा. फु. पु. वि.च्या इतिहास विभागप्रमुख डॉ श्रद्धा कुंभोजकर मॅडम,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, प्राचार्य डॉ. जी पी ढाकणे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र फसले, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे तसेच सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें