मांजरी शाळेने स्नेहसंमेलनातून उपस्थितांची जिंकली मने
मांजरी (किशोर बाचकर): जि प मांजरी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लताबाई आंबडकर,प्रमुख पाहुण्या केंद्रप्रमुख नीलिमा गायकवाड, विषयातज्ञ् सतिष तांदळे हे होते..यावेळी रासपाचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, उपसरपंच तुषार विटनोर, केंद्रप्रमुख नीलिमा गायकवाड यांनी मनोगतातून शाळेचा वाढता आलेख,शिक्षकाचे परिश्रम,जिल्हास्तरापर्यंत मिळालेला नावलौकिक यावर कौतुक करताना पालकांनी आपले पाल्य प्रवेशित करण्याचे आवाहन केले.
शाळेच्या विकासासाठी प्रा. अशोक कुदनर यांनी ११००० रुपयाची देणगी दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाची वेळी ग्रामस्थ व मान्यवरांनी बक्षीस देताना शाळेवर भरभरून प्रेम केले.यावेळी मंचावर मा. उपसरपंच अण्णासाहेब विटनोर, सदस्य कोंडीराम विटनोर,संतोष विटनोर, विश्वनाथ आंबडकर,सोसायटी चेअरमन शिवाजी काळे, व्यवस्थापन अध्यक्ष अंकुश जाटे,सेंदोरे गुरुजी उपस्थित होते.
प्रास्तविक मुख्याध्यापिका शकुंतला औटी,अध्यक्ष निवड नवनाथ खंडागळे,अनुमोदन शिवाजी गवते,आभार सदस्य राजेंद्र बिडगर तर सूत्रसंचालन डॉ.संजय बोरुडे यांनी केले.
ग्रामदैवत चंद्रगिरी महाराजांचे गुणगान करणारं गीत,खंडोबा गीत,संत गोराकुंभार भक्ती महात्म्य,गणेश वंदना व हिरकणी सारख्या नृत्याविष्काराने उपसितांची मने जिंकली.यावेळी महिला,ग्रामस्थ व तालुका भरातून अनेक शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चारुशीला चिलेकर,गोरक्षनाथ विटनोर,सविता पंडित,संजय तेलोरे,केतकी गौरीधर व शाळा व्यवस्थापन समितीची सदस्य ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.