मिरी येथे सद्गुरु रघुनाथ महाराज उंबरेकर बाबांच्या फिरत्या नारळी सप्ताहाचे ध्वजारोहण संपन्न

मिरी येथे सद्गुरु रघुनाथ महाराज उंबरेकर बाबांच्या फिरत्या नारळी सप्ताहाचे ध्वजारोहण संपन्न

मंगळवार दिनांक १५ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान होणार भव्य नारळी सप्ताह

मिरी : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर संस्थानचे संस्थापक ब्र.भु.सद्गुरू रघुनाथ महाराज उंबरेकर यांनी सुरू केलेल्या भगवान आदिनाथांच्या ६१ व्या फिरत्या नारळी सप्ताहाचे मिरी येथे मंगळवार दिनांक १५ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले असून, सदर सप्ताहाचे ध्वजारोहण रविवारी सकाळी वृद्धेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर  यांच्या हस्ते संपन्न झाले.
      ब्र.भू.सद्गुरू रघुनाथ महाराज उंबरेकर यांनी ६१ वर्षांपूर्वी भगवान आदिनाथांचा फिरता नारळी सप्ताह सुरू केला होता.तेव्हापासून हा सप्ताह दरवर्षी अखंडपणे सुरू असून सद्गुरू रघुनाथ महाराज यांच्यानंतर ह.भ.प.गुरुवर्य वै.पंढरीनाथ महाराज उंबरेकर यांनी या सप्ताहाचे व्यासपीठ सांभाळले. व त्यांच्या पश्चात सद्यस्थितीत ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर यांच्या अधिपत्याखाली सदर फिरत्या नारळी सप्ताहाचे कार्य अविरत सुरू आहे.
मिरी येथे सदर नारळी सप्ताह सहाव्यांदा होत असून, सद्गुरु रघुनाथ महाराज उंबरेकर यांचे अनेक वर्ष मिरी येथे वास्तव्य राहिल्याने या भागात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर महिला कीर्तनकारांमध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या आळंदीस्थित परमपूज्य गुरुवर्य कु.मिराबाई महाराज मिरीकर या देखील त्यांच्याच शिष्या असल्याने मिरी ग्रामस्थानी रघुनाथ महाराज उंबरेकर यांचे मिरी येथे भव्य मंदिर देखील उभारलेले आहे. त्यामुळे या नारळी सप्ताहाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 
     रविवारी झालेल्या ध्वजारोहण प्रसंगी ह.भ.प.भागवत महाराज वेताळ,सरपंच जालिंदर गवळी,माजी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी,माजी सरपंच संतोष शिंदे,माजी उपसरपंच आण्णा पाटील शिंदे,डॉ.बबनराव नरसाळे,विजय गवळी,राजेंद्र गवळी सर,बंडू झाडे,बापू झाडे,संजय नवल,एकनाथ झाडे,नारायण सोलाट,संभाजी सोलाट,अशोक जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी रोख स्वरूपात देणगी देऊन सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
सप्ताहाची रूपरेषा:

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें