पाथर्डीत महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दि. ५ एप्रिल रोजी महान चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांची २३२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पाथर्डी तालुका बौद्ध महासभेचे श्रीपत बळीद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक अरूण भोंगळे, प्रा. रतीलाल क्षेत्रे उपस्थित होते.
यावेळी महेंद्र राजगुरू, श्रीकांत बोर्डे, सुंदरदास कांबळे, अंबादास आरोळे, सेवा निवृत्त तहसीलदार जगदीश गाडे, मिनाताई शिंदे सह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.आपले विचार व्यक्त करतांना सम्राट अशोक यांचा जीवन पट व कार्य यावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी संजय साळवे, आनंद रंधवे, भिमराज शिंदे, दिनकर खंडागळे, सुभाष पगारे, प्रशांत मगर, बाळासाहेब गायकवाड, गौतम ढेकणे, भिमा थोरात, अशोक पगारे, भाऊसाहेब आरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य सुरज क्षेत्रे यांनी केले तर आभार आनंद पंडागळे यांनी मानले.