आजिनाथ दहिफळे यांचे कार्य पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे- प्राचार्य अशोक दौंड

आजिनाथ दहिफळे यांचे कार्य पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे- प्राचार्य अशोक दौंड

लोकमत एक्सलन्स ग्लोबल अवॉर्ड प्राचार्य अशोक दौंड सन्मानित

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून रात्र शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र, स्कॉलरशिप परीक्षांचे मार्गदर्शनाने लागलेला उत्कृष्ट निकाल आणि, विविध क्षेत्रांमध्ये संधी निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी व्याख्याने आयोजित करणारी रात्रशाळा ही एक आदर्श शाळा ठरत आहे, असे प्रतिपादन श्री तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांनी केले.
श्री संत भगवान प्रतिष्ठान व परिवर्तन अभ्यासिका, दैत्य नांदूर यांच्यावतीने श्री तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांना लोकमत एक्सलन्स ग्लोबल अवॉर्ड मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
दैत्यनांदूर सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चालविण्यात येणारी रात्रशाळा म्हणजे केवळ एक अभ्यासिका नव्हे तर विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देणारी उदयन्मुख संस्था आहे. ग्रामीण भागात आजिनाथ दहिफळे सारख्या नवयुवकाने निस्वार्थी भावनेने सुरू केलेली ही चळवळ निश्चितच दिशादर्शक आणि प्रेरणादायी नव्हे तर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त करण्यात आले.
प्राचार्य अशोक दौंड यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना माझे गाव कोनोशी असून दैत्य कृपेने पुनीत झालेल्या या दैत्य नांदूर मधील अनेक शिक्षकांनी सोनोशी या ठिकाणी शाळेत असतांना माझ्यावर चांगले संस्कार केले त्यामध्ये कै.सिताराम गर्जे गुरूजी, कै.राम दहिफळे गुरुजी तसेच लहानपणी आजारी पडल्यानंतर ज्यांच्या इंजेक्शनने बरा व्हायचो, असे डॉ.सुभाष देशमुख याचाही उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणातून केला.
या रात्रशाळेत अभ्यास करून एन. एम. एम.एस. व सारथी शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या धनंजय दौंड, कृष्णा देशमुख, सार्थक घुले, प्रशांत काकडे, सार्थक माने, दर्शन काकडे, प्रतिक काकडे, गोपाल किलबिले विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास मेजर दिलीप पालवे, एकनाथ पालवे,एकनाथ काकडे मेजर, बंडुनाना खंबायत,विकास दौंड, डॉ.अनिल पानखडे, महेंद्र राजगुरू व बहुसंख्य विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें