बहुजन जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी आनंद रोकडे यांची निवड
बहुजन जनता पक्षामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील कासळवाडी- भालगाव येथे बहुजन जनता पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.भालगाव येथून बहुजन जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी २१ बुलेट- टू व्हीलर घेऊन कासळवाडी येथे रॅली काढण्यात आली.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने या बैठकीला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ थोरात, महाराष्ट्र अध्यक्ष राजेभाऊ रोकडे या मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत बहुजन जनता पक्ष पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये अहिल्यानगर जिल्हा संघटक आकाश जाधव, पाथर्डी तालुकाध्यक्ष आनंद रोकडे, भालगाव- खरवंडी गट अध्यक्ष अर्जुन वाल्हेकर व इतर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश करून त्यांची कार्यकारणी पदाधिकाऱ्यापदी निवड करण्यात आली.या पक्षाचे ध्येय धोरण व इतर सामाजिक कार्य नेत्र दीपक आहे, हे लक्षात घेऊन बहुजन जनता पक्षाला कार्यकर्ते पसंत करतात.
बहुजन जनता पक्षाचे संस्थापक तथा अध्यक्ष बालाजी घुमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रभर कार्यकर्ते बहुजन जनता पक्षाचे काम करत आहेत.युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ थोरात यांच्या आदेशाने गाव, खेडी, वस्त्या, तांड्यामध्ये पक्ष वाढीचे काम जोमत सुरू होत आहे. या पक्षामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांनी प्रवेश केला आहे. महाराष्ट्र युवा संघटक अभिमान कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष राजेभाऊ रोकडे, जिल्हाध्यक्ष सुनिल रोकडे यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या जल्लोषात पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी बहुजन जनता पक्षाचे बहुसंख्येने कार्यकर्ते व गावचे नागरिक उपस्थित होते.