राजळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फुले कृषी विद्यापीठ,मुळा धरणास भेट
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामार्फत एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडावी तसेच प्रत्यक्ष निरीक्षण,आकलन आणि अवलोकन या सर्व गोष्टींचा विकास होण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भेट देऊन तेथील संशोधनासाठी उपयोगी असलेल्या यंत्र सामग्री बद्दल सखोल माहिती घेतली. अप्पासाहेब राजळे, शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव राजळे, दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त राहुलदादा राजळे, सचिव आर. जे. महाजन, प्राचार्य डॉ. राजधर टेमकर,अधीक्षक श्री विक्रम राजळे यांनी अभिनंदन केले.
सहलीचे आयोजन प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अतुल चौरपगार व प्रा. महेश गोरे यांनी केले व शैक्षणिक सहल यशस्वी होण्याकरिता सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.