स्व.निर्मलाताई काकडे यांची ३८ वी पुण्यतिथी साजरी
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील भालगाव येथील भालेश्वर विद्यालयात स्व.निर्मलाताई काकडे यांची ३८ वी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हनुमान गोर्डे हे होते. जेष्ठ शिक्षक श्री.श्रीकांत सोनवणे, श्री. प्रविण पाचंग,समन्वयक श्री. नजन दिगंबर, श्री. भाऊसाहेब शिंदे, श्री. बंडू आबा सुपेकर या सर्वांच्या शुभहस्ते स्व. निर्मलाताई काकडे, कर्मयोगी आबासाहेब काकडे, विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गोर्डे हनुमान यांनी आपल्या मनोगतातून स्व.निर्मलाताई काकडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच जेष्ठ शिक्षक श्री.श्रीकांत सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाषणे केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. वैष्णवी बेद्रे हिने केले तर सूत्रसंचालन कु. स्वाती खेडकर व कु.विद्या खेडकर या विद्यार्थिनींनी केले. शेवटी सर्वांचे आभार कु.माधुरी कराड हिने मानले.