पाथर्डीत युवासेनेच्या मॉक टेस्ट ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पाथर्डीत युवासेनेच्या मॉक टेस्ट ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परीक्षेसाठी २०० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना विस्तारक अजय वानोळे व विभागीय सचिव विराज कावडिया यांच्या सहकार्याने इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी युवासेनेच्या वतीने मॉक टेस्ट परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
ही परीक्षा एम. एम. निह्राळी विद्यालयात पार पडली.परीक्षेसाठी २०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, तर सुमारे १८० विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेला उपस्थित राहिले. पाथर्डी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय होता. या पेपर ची सुरुवात सरस्वती माता व हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली.
युवासेना जिल्हाप्रमुख पप्पू भाले यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी या संधीचे स्वागत केले असून भविष्यातही युवासेनेने अशा उपयुक्त परीक्षा आयोजित कराव्यात, अशी मागणी होत आहे.शिवव्याख्याते सचिन नागापुरे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नगर, पुणे छ.संभाजीनगर, लातूर अशा शहरात क्लासेसला जाता येत नाही. विद्यार्थी घरीच थांबवून अभ्यास करतात. अशा विद्यार्थ्यांना या मॉक टेस्ट चा नक्कीच फायदा होतो.

     या उपक्रमासाठी एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड.प्रतापराव ढाकणे आणि प्राचार्य संजय घिगे यांचे विशेष योगदान लाभले. तसेच घनशाम शेलार, राजेश डागा, गणेश सरोदे, ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे ज्ञानेश्वर कचरे, आयकॉन क्लासेसचे चितळे आणि जायभाय यांनीही परीक्षेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनामागे युवासेना शहरप्रमुख आणि शिवव्याख्याते सचिन नागापुरे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांच्या नेतृत्वाखाली युवासेना तालुकाप्रमुख आकाश म्हस्के, समन्वयक शाम कराळे, उपशहरप्रमुख मंगेश राठोड, राम दराडे, भूषण नागापुरे आणि इतर युवाशिवसैनिकांनी परीक्षेसाठी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांना NEET-UG, फार्मसी,इंजिनिअरिंग आणि लॉ परीक्षेची तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम ठरला, असे मत उपस्थित विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केले.युवासेनेच्या या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें