समर्पित भावनेने केलेल्या कामाची समाज नक्कीच दखल घेतो- सतिश गुगळे
आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले प्राचार्य अशोक दौंड यांचा सत्कार समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असतांना समाज आपल्या कामाची दखल घेत असतो. सकारात्मक ऊर्जेने केलेल्या कामाचे फलित हे नेहमीच चांगले मिळते, असे प्रतिपादन श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे यांनी व्यक्त केले.
विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमत वृत्तपत्र समुहाने ग्लोबल एक्सलन्स ॲण्ड समिट अवॉर्ड- २०२५ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने हाँगकाँग येथे प्रसिद्ध चित्रपट निर्माता व दिग्दर्शक सोनू सूद यांच्या हस्ते व चित्रपट अभिनेत्री आहाना कुमरा व लोकमत वृत्तपत्र समूहाचे आशिष जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने त्यांचा विद्यालयात सत्कार समारोह आयोजित करण्यातआला होता. या प्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, प्राचार्य अशोक दौंड यांनी ३४ वर्ष या विद्यालयामध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक ते प्राचार्य पदावर काम करत असतांना आत्तापर्यंत समर्पण भावनेने काम केलेले आहे.सर्व शैक्षणिक उपक्रमामध्ये विद्यालय सतत अग्रेसर राहिलेले आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण उपक्रमाची दखल घेवून लोकमत परिवाराने त्यांना सन्मानित केलेले आहे. ही विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे.
या वेळी विद्यालयातील शिक्षक वक्ते म्हणून सुनिल कटारिया यांनी प्राचार्य अशोक दौंड यांचा जीवनपट विद्यार्थ्यांच्या समोर उभा केला. यावेळी मंचावर संस्थेचे विश्वस्त धरमचंद गुगळे, कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. सचिन गांधी, डॉ.अभय भंडारी, विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलावर फकीर, अजय भंडारी, सुधाकर सातपुते उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य अशोक दौंड यांचा शिक्षण क्षेत्रातील ३४ वर्षाचा कालखंड तसेच त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयात राबवले गेलेले शैक्षणिक क्षेत्रातील विविध नवनवीन प्रयोग या बाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनिल पानखडे यांनी केले तर सूत्रसंचालन विवेक सातपुते यांनी केले.आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलावर फकीर यांनी मानले.