मातृभाषेतील शिक्षण म्हणजे ज्ञानग्रहणाचा पाया – शिक्षणाधिकारी बुगे

मातृभाषेतील शिक्षण म्हणजे ज्ञानग्रहणाचा पाया शिक्षणाधिकारी बुगे

प्रतिनिधी – किशोर बाचकर,

मांजरी, ता.राहुरी: मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अपरिचित संकल्पना दृढ करते.मातृभाषा शिक्षणातूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे चैतन्य विटनोर असल्याचं मत शिक्षणाधिकारी सदानंद बुगे यांनी व्यक्त केले. राहुरी तालुक्यातील मांजरी येथील जिल्हा परिषद शाळेस दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.

यावेळी स्पर्धा परीक्षेचा मांजरी पॅटर्नचे त्यांनी विशेष कौतुक केले. विविध वर्गांना भेटी देत विद्यार्थ्यांशी शैक्षणिक संवाद साधून वर्गशिक्षकांचे कौतुक केले. शाळेच्या विविध उपक्रमातील नाविन्यता व जिल्हास्तरापर्यंत गाठलेली मजल यातच सर्व शिक्षकांचे कष्ट दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. मातृभाषेतल्या शिक्षणाने अनेक अधिकारी निर्माण केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले व सर्वांनी मातृभाषेतील शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन देखील सदानंद बुगे त्यांनी केले आहे.
यावेळी नवोदय परीक्षेत निवड झाल्याबद्दल चैतन्य विटनोर या विद्यार्थ्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक शकुंतला औटी, संजय बोरुडे, नवनाथ खंडागळे, चारुशीला चिलेकर, शिवाजी गवते, गोरक्षनाथ विटनोर, सविता पंडित, संजय तेलोरे, केतकी गौरीधर आदी उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें