प्रवरा माध्यमिक विद्यालयात चिमण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था

प्रवरा माध्यमिक विद्यालयात चिमण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था

प्रवरा विद्यालयाने उपक्रम राबविला ‘एक थेंब चिऊताईला…’

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील भूते टाकळी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय येथे मागील तीन वर्षापासून राबवत असलेला उपक्रम एक थेंब चिऊताईला… हा उपक्रम मार्च ते मे महिन्यापर्यंत राबविण्यात येतो. चिमण्यांसाठी विद्यालयामध्ये ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाते. या उपक्रमाची सुरुवात बुधवार पासून केली. यावेळी विद्यालयास जालिंदरनाथ माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक मुख्याध्यापक श्री मिथुन डोंगरे,पद्मभूषण वसंत दादा पाटील विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब मिसाळ, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक वसंतराव खेडकर, माध्यमिक सोसायटीचे माजी संचालक बाळासाहेब राजळे, माध्यमिक शिक्षक संघ चे अध्यक्ष छबुराव फुंदे,दुर्गादेवी माध्यमिक विद्यालयाचे निलेश रुईकर,अविनाश नेहुल यांनी सदिच्छा भेट दिली.
या उपक्रमाचे प्रमुख श्री बंडोपंत गोडगे, श्री.भगत अशोक व मार्गदर्शक मुख्याध्यापक पठाण आसिफ यांचे विद्यार्थ्यांना याबाबतीत बहुमोल मार्गदर्शन झाले. याप्रसंगी आजिनाथ टाकळकर, फुंदे बाळासाहेब, सांबारे धनंजय, वाल्मिक फुंदे, अशोक खेडकर आदी उपस्थित होते. आलेल्या सर्व पाहुण्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पठाण आसिफ यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें