मृणाल नरवडे हिची ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत निवड
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील जवखेडे येथील रहिवासी कु.मृणाल अविनाश नरवडे हिची पुण्यातील नामांकित ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सदाशिव पेठ येथे इयत्ता ५ वी साठी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून निवड झाली आहे.
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही १९६८ सुरू झालेली शाळा आहे. ही शाळा सी बी एस इ (CBSE) च्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण देते. ह्या शाळेत ५ वी ते १०वी या इयत्ता आहेत. प्रत्येक इयत्तेत मुले व मुली अश्या दोन तुकड्या व प्रत्येक तुकडीत ४० मुले असतात. शाळेत इंग्रजी, हिंदी, मराठी व संस्कृत ह्या चार भाषा आहेत. गणित, समाजशास्त्र व शास्त्र हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविले जातात. शाळेत दर आठवड्यातील शुक्रवारी एका विषयाची परीक्षा असते. शाळेत मुलांना भविष्यवेध प्रकल्प, विशेष उद्दिष्ट्य गट यांसारखे प्रकल्प असतात. याचबरोबर ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी, सोलापूर, हराळी इत्यादी ठिकाणीही प्रशाला चालतात.
मृणाल जिल्हा परिषद शाळा मांडवे येथील विद्यार्थिनी आहे. तिला मांडवे शाळेतील शिक्षक श्री चंदनशिव, श्री कोलते, श्रीमती चेडे सरला,श्री नवनाथ म्हस्के, श्री अरुण नेहूल तसेच ते गटशिक्षणाधिकरी अनिल भवार, आजी,आजोबा, आई, वडिल यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मृणाल च्या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतूक होत आहे. मा. सभापती काशिनाथ पा. लवांडे, पंचायत समिती सदस्य सुनिलशेठ परदेशी,युवानेते, जि.प.चे पुरुषोत्तम आठरे, मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड, आ. मोनिका राजळे यांनी अभिनंदन केले.