कर्मवीरांचा पाईक होण्याचे भाग्य मला लाभले- शिवशंकर राजळे

कर्मवीरांचा पाईक होण्याचे भाग्य मला लाभले- शिवशंकर राजळे

शिवशंकर राजळेंचा न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने सत्कार

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
कर्मवीरांचा पाईक होण्याचे भाग्य मला लाभले असून या संधीचा फायदा ग्रामीण विद्यार्थी घडवण्यासाठी व संस्थेला शैक्षणिक विकासासाठी करण्याची ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग सल्लागार शिवशंकर राजळे यांनी कोरडगाव येथे सल्लागारपदी नियुक्ती निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल कोरडगाव यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण काकडे, अनिल बंड, बाबासाहेब किलबिले, स्वप्निल देशमुख, त्रिंबक देशमुख हे होते.
यावेळी पुढे बोलताना राजळे म्हणाले की, कर्मवीरांनी ग्रामीण भागात ज्ञानगंगा पोहोचण्यासाठी लोकसहभागाचा आधार घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध झाल्या. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी लोकसहभागाचा विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे, असे राजळे यांनी यावेळी बोलतांना मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य संतोष तिवारी, नारायण देशमुख, जितेंद्र काकडे, बशीर शेख, कल्याण घुले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पाखरे यांनी केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें