केंद्रप्रमुख रामदास बाबा गोसावी यांचा निरोप समारंभ
पाथर्डी, येळी केंद्रातील मुख्याध्यापक-उपाध्यापकांच्या वतीने कृतज्ञता
केंद्रप्रमुख बाबागोसावी यांची नगर तालुक्यात बदली
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
नुकत्याच पार पडलेल्या केंद्रप्रमुखपदांच्या बदली प्रक्रियेअंतर्गत पाथर्डी तालुक्यातील सर्वांचे प्रेरणास्थान, अत्यंत अभ्यासू आणि सर्वाभिमुख व्यक्तिमत्व असलेले रामदास गणपत बाबागोसावी यांची नगर तालुक्यात बदली झाली. त्यांच्या अल्पशा सहवासाने अनमोल असे आदर्श त्यांनी तालुक्याला दिले आहे. पाथर्डी व येळी केंद्रांच्या वतीने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन्ही केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व उपाध्यापक यांच्या वतीने कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला.
शहरातील विवेकानंद विद्यालयातील सेमिनार हॉल येथे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु आणि भगिनींनी बाबा गोसावी यांच्या मार्गदर्शनातील अनेक अनुभवांचे स्मरण करून त्यांच्यातील गुणांचे कौतुक केले.यावेळी अनुभव कथन करतांना अनेक शिक्षक बांधव भावूक झाले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. रोहोकले गुरुजी उपस्थित होते.सर्व केंद्रप्रमुख बँकेचे पदाधिकारी गहिनीनाथ शिरसाट, संतोष अकोलकर, दिलीप बोरुडे,सर्व केंद्रप्रमुख,श्रीकृष्ण खेडकर,सुरेश खेडकर,कमलेश केदार ,दीपक बांगर ,रविंद्र फुंदे,भागवत गर्जे,विठ्ठल देशमुख,अशोक आंधळे, केंद्रप्रमुख उद्धव बडे, रावसाहेब कांबळे, भास्कर कुलट,श्रीम.महांडुळे व मोठ्या संख्येने महिला शिक्षक भगिनी उपस्थित होत्या. यावेळी बाबागोसावी सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना रोहोकले गुरुजी म्हणाले,शिक्षक बंधु-भगिनींनी विद्यार्थी घडवतांना आपापसात गैरसमज न करता सुयोग्य समन्वय साधावा व प्रथम प्राधान्याने विद्यार्थ्यांना घडवावे, असे याप्रसंगी सांगितले. गोसावी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दुसऱ्याची निंदा करु नये,अपशब्द बोलु नये,तोंड दोन वेळेलाच उघडावे, एकदा जेवणासाठी आणि दुसर्यांदा पविञ बोलण्यासाठी निंदेचे श्रवण नको. माझ्या कानी,निंदा ऐकु नये.जगा आणि जगु द्या,असा मूलमंञ जगण्यात असावा.जीवन घडवण्यासाठी ४ स्तंभ आहेत ते म्हणजे सत्याच्या बाजूने रहावे,न्यायबुद्धी सतत जागरुक असावी,प्रामाणिकपणा हा कुटुंबाशी,कर्तव्याशी प्रामाणिक असावे,उत्तम चारिञ्य जपणं आणि त्याच्यासाठी पराकाष्ठा करणे.ध्येयवेडी माणसे जग घडवतात.वेळ देणं जीवन देण्यासारख आहे.आनंद लहान मुलासारखा साजरा करायला हवा.परिस्थिती माणसाला घडवते.दूरगामी परिणाम बालकांवर घडवण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी जबाबदारीनं वागल पाहिजे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
अतिशय प्रेरक वातावरणात हा कृतज्ञता समारंभ पार पडला. सूत्रसंचालन ज्योती आधाट यांनी केले तर आभार दिलीप बोरुडे यांनी मानले.