माता रमाई महिला मंडळाच्या वतीने फाल्गुन पौर्णिमा साजरी
पाथर्डी प्रतिनिधी, राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील निवडूंगे येथे माता रमाई महिला मंडळाच्या वतीने दि. १४ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा साजरी करण्यात आली.
निवडूंगे गावातील माता रमाई महिला मंडळाच्या विचारांनी प्रत्येक महिन्याची पौर्णिमा घरोघरी घेण्याचा संकल्प केलेला आहे, या उद्देशाने फाल्गुन पौर्णिमेचा कार्यक्रम ज्योती शिंदे यांचे निवासस्थानी आयोजीत करण्यात आला होता.
भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व लहान- थोरांनी वंदन करून अभिवादन केले तसेच पौर्णिमेचे अष्टशील ग्रहण करून शिलाचे पालन केले. या कार्यक्रमात शिंदे परिवारातील दोन छोट्या मुलांनी भीम गीतांचे अतिशय सुंदर गायन केले तसेच प्राजक्ता शिंदे, कामिनी शिंदे यांनी गौतम बुद्धावर गीत गायन केले. प्रताप शिंदे व कु. गायत्री शिंदे यांनी फाल्गुन पौर्णिमेनिमित्त भाषण केले.
भारतीय बौद्ध महासभेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष श्रीपत बळीद यांनी उपस्थितांना शुभेच्छा देतांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे दाखले दिले तसेच जिल्हा कोषाध्यक्ष विजय हुसळे यांनी त्यांच्या मधूर वाणीतून फाल्गुन पौर्णिमा आणि बुद्ध धम्मातील इतर सर्व सणवार कशा पद्धतीने साजरे करावेत, याची सखोल माहिती दिली.
यावेळी बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस दिलीप सरसे, कोषाध्यक्ष संजय साळवे, प्रमुख सल्लागार पप्पूशेठ बोर्डे, कार्यालयीन सचिव भीमराज शिंदे, ज्योती शिंदे, शांताबाई कोकणे, ललिता शिंदे, विमल चव्हाण, सुरेखा शिंदे, आरती शिंदे, इंदुबाई साळवे, रोहिणी तिजोरे, प्रल्हाद शिंदे, इंद्रजीत शिंदे, दयानंद शिंदे, हर्षल शिंदे, किशोर शिंदे, मंगेश शिंदे, सुभाष शिंदे, यशवंत शिंदे, सुरेश ढवळे, संतोष कोकणे, साहिल शिंदे, डॉ. अमोल कोतकर, संजय गुंजाळ, रशीद शेख, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन जिल्हा संघटक बाळासाहेब धस यांनी केले तर आभार मिनाताई शिंदे यांनी मानले.