श्री आनंद महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
श्री आनंद महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अतिशय जल्लोषात पार पडला.सुप्रसिद्ध ख्यातनाम दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक पारितोषिके वितरित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे अध्यक्षस्थानी होते.
श्री आनंद महाविद्यालय दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवीत असते, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा देखील आयोजित करत असते. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून प्रा. सुर्यकांत काळोखे, सांस्कृतिक विभागप्रमुख दरवर्षी “युवा महोस्तव” साजरा करत असतात. यावर्षी देखील युवामहोस्तव अतिशय जल्लोषात संपन्न झाला. प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांनी अतिशय प्रभावीपणे आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कर्तव्य, महिला स्वांतत्र्य, दुष्काळ तसेच संविधानाचे महत्त्व आणि गरज या विविध विषयांवर त्यांनी आपली मते अतिशय परखडपणे मांडली. आजच्या काळामध्ये इतिहास आपल्या समोर असताना देखील आज महिला सुरक्षित नाहीत हे देखील त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी वर्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामधुन महाविद्यालयाची संशोधन तसेच इतर विविध क्षेत्रामधील उल्लेखनिय कामगिरीबद्दल प्रमुख पाहुण्यांना सांगीतले. तसेच प्राध्यापकांनी मिळविलेल्या पेटंट बद्दल त्यांनी कौतुक करून प्राध्यापकांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमासाठी श्री त्रिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे खजिनदार सुरेशलाल कुचेरिया, विश्वस्त राजेंद्र मुथ्था, महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. जयश्री खेडकर यांनी केले तर आभार प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी मानले.