सातवड येथे डॉक्टर भावानेच केला भावाचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सातवड येथे डॉक्टर भावानेच केला भावाचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

करंजी: पाथर्डी तालुक्यातील सातवड येथे राहणाऱ्या सोमनाथ रामराव पाठक (वय ३५) याचा मृतदेह काल पहाटे त्याच्या घराच्या पाठीमागील संत्र्याच्या बागेत आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, तसेच डोक्याला मोठी जखम आणि पाय मोडलेले होते. यामुळे हा खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

मयताची आई सौ. सिंधुबाई पाठक यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, मयताचा मोठा भाऊ डॉ. अशोक रामराव पाठक (वय ३९, हल्ली राहणार साजिरा बिल्डिंग, नवनाथनगर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मयत – सोमनाथ रामराव पाठक

कशामुळे झाला खून?

आरोपी अशोक पाठक याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात सांगितले की, त्याचा भाऊ सोमनाथ रोज मद्यपान करून आईला व स्वतःच्या मुलाला मारहाण करायचा आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे त्याला समजावण्यासाठी आरोपी ९ मार्च रोजी सातवड येथे आला. मात्र, त्यावेळी सोमनाथ दारू पिलेला होता. आरोपीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पुन्हा आई आणि मुलाला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपीने संतापाच्या भरात लाकडी दांडक्याने सोमनाथच्या डोक्यावर, पाठीवर, छातीवर व पायावर जबर मारहाण केली.यावेळी सोमनाथ जीव वाचवण्यासाठी संत्र्याच्या बागेत पळाला, पण आरोपीने त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा मारहाण केली व एका झाडाला हात बांधून ठेवलं. काही वेळाने त्याची हालचाल थांबल्याचे लक्षात आल्यावर आरोपी तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता सिंधुबाई पाठक शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेल्या असता त्यांना मुलाचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांचा झटपट तपास; आरोपी गजाआड

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व साक्षीदारांच्या जबाबांवरून तपास केला असता, गुन्हा डॉक्टर असलेल्या मोठ्या भावानेच केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीला ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें