महिला दिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न
शाळेतील ९८ विद्यार्थींनींचा सहभाग
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पाथर्डी या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
२१व्या शतकात आज प्रत्येक महिला पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे.
विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या महिलांची वेशभूषा परिधान करून शाळेतील ९८ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यात राजमाता जिजाऊ, पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, डॉ.आनंदीबाई जोशी, अंतराळवीर कल्पना चावला, क्रिकेटपटू स्मृती मानधना, डॉ. किरण बेदी, समाज सुधारक मदर तेरेसा, हिरकणी, महिला पोलीस अधिकारी इत्यादी वेशभूषा सादर करून त्यांचा जीवनप्रवास सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडला. या उपक्रमासाठी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा संस्थेच्या वतीने सन्मान व गौरव करण्यात आला. यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी,जयश्री एकशिंगे, मनिषा गायके, आशा बांदल,राधिका सरोदे, ज्योती हंपे,कीर्ती दगडखैर, विद्या घोडके, अनिता भावसार, लक्ष्मी सोनवणे, ज्ञानेश्वरी मुर्रे यांनी परिश्रम घेतले.