बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्ष पदी श्रीपत बळीद,दिलीप सरसे सरचिटणीस
भारतीय बौद्ध महासभेच्या पाथर्डी तालुका कार्यकारिणीची निवड
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर तसेच राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु. जी. बोराडे, सरचिटणीस अशोक केदारे यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अंतर्गत पाथर्डी तालुक्याची नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा सरचिटणीस सतीश ओहोळ, जिल्हा कोषाध्यक्ष विजय हुसळे, जिल्हा सचिव (प्रचार/ पर्यटन) राम गायकवाड, पाथर्डी पालकमंत्री अरुण भोंगळे, जिल्हा संघटक बाळासाहेब धस यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडण्यात आली. संपूर्ण कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष- श्रीपत बळीद,सरचिटणीस- दिलीप सरसे, कोषाध्यक्ष – संजय साळवे,उपाध्यक्ष( संस्कार)- सुंदरदास कांबळे,उपाध्यक्ष( प्रचार/ पर्यटन)- पुरुषोत्तम रंधवे,उपाध्यक्ष (संरक्षण )- अंबादास आरोळे,हिशोब तपासणीस- महेंद्र राजगुरू,कार्यालयीन सचिव- भीमराज शिंदे, सचिव (संस्कार)- प्रदीपकुमार पगारे,सचिव( संस्कार )- मधुकर शिरवाळे,सचिव( प्रचार/ पर्यटन)- बाळासाहेब गायकवाड,सचिव (प्रचार/ पर्यटन)- दिनकर खंडागळे,सचिव (संरक्षण )- मुरलीधर साळवे,सचिव( संरक्षण)- विकास दौंडे,संघटक – जगदीश गाडे,संघटक- एकनाथ ठोकळ,गौतम ढेकणे, श्रीकांत काळोखे,भीमा थोरात, मधुकर उबाळे,लौकिक कांबळे, सुरज क्षेत्रे इत्यादी.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस सतीश ओहोळ, कोषाध्यक्ष विजय हुसळे यांच्या सहीने पाथर्डी तालुका शाखा अध्यक्ष श्रीपत बळीद यांना शाखा मान्यता प्रमाणपत्र देण्यात आले. पाथर्डी तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या नियमांच्या अधीन राहून धम्माचे काम अधिक गतिमान करू असा विश्वास श्रीपत बळीद यांनी व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भगवंत गायकवाड, सरचिटणीस सतीश ओहोळ, प्रचार पर्यटन सचिव राम गायकवाड, पाथर्डी तालुका प्रभारी अरुण भोंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती सांगितली. अंबादास आरोळे,सुंदरदास कांबळे, दिगंबर गाडे, काकासाहेब शिंदे, महेंद्र राजगुरू, दिलीप सरसे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीपत बळीद यांनी सर्वांचे आभार मानले.शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.शाखेतर्फे भोजनदान ठेवण्यात आले होते.