ऐन उन्हाळ्यात वांबोरी चारीला पाणी
फळबागांना जिवदान, लाभार्थ्यांनी मानले आमदार कर्डिलेंचे आभार!
करंजी (अशोक मोरे)
सतत दुष्काळी असलेल्या पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारीस भर उन्हाळ्यात पाणी आल्याने या भागातील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत असुन या पाण्यामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाई कमी होईल.
पाथर्डी तालुक्याच्या करंजी, मिरी, तिसगाव परिसरात कायमचा दुष्काळ ठरलेला असतो. परंतु या भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारीचे पाण्याचे नियोजन केले तर या भागातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होते. या भागातील अनेक गावाला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टॅन्कर चालु असतात. यावर्षी मात्र दुष्काळी भागाची जाणीव व प्रश्न माहित असलेले या भागाचे कर्तव्यदक्ष आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी भर उन्हाळ्यात वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने वांबोरी चारीचे पाणी या भागातील पाझर तलावात पोहचले आहे. या भागातील भोसे येथील मांगदरा तलाव, ढेला तलाव, बोरुडे तलावात मोठ्या दाबाने वांबोरी चारीचे पाणी चालु आहे. वांबोरी चारीच्या या पाण्यामुळे या भागातील फळबागांना जिवदान मिळुन उन्हाळ्यातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होईल. भोसे येथील टेमकरवाडी तलावात वांबोरी चारीचे पाणी जात नाही त्याविषयी आपण आमदार शिवाजीराव कर्डीले यांना माहिती दिली असुन या तलावाचा वांबोरी चारी टप्पा दोनमध्ये समावेश करावा अशी मागणी केली असल्याचे प्रदिप टेमकर यांनी सांगितले. भर उन्हाळ्यात वांबोरी चारीला पाणी सोडल्याबद्दल आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे प्रदीप टेमकर मेजर, युवराज जोगदंड, देविदास टेमकर, बाळासाहेब बांगर, कैलास कराळे,
अंबादास वारे, भगवान वारे, विष्णू टेमकर, रमेश टेमकर मेजर,पोपटराव शिंदे, अंबादास टेमकर,रवींद्र शिंदे,अशोक आनंदा टेमकर,आप्पा शिंदे, भाऊसाहेब टेमकर, भगवान शिरसाठ, रविंद्र वारे, बाळासाहेब टेमकर, शंकर टेमकर, संजय शिरसाठ, विठठल टेमकरसह अनेक कार्यकर्त्यानी आभार मानले आहेत.